• If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.

Horror मुंबई - पुणे हायवे

Mr. Magnificent

Marathi section king
Supreme
4,545
3,237
144

मुंबई - पुणे हायवे
(टीप - ही कथा पुर्णतः काल्पनिक आहे. वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही.)

सायंकाळचे ७ वाजले होते अक्षय स्टॉप वर गेला. १ तास उभा होता शेअरिंग कार ने तो पुण्याहून मुंबईला निघाला होता "भाई अजुन किती वेळ लागेल" मागच्या सीट वरून थोड तोंड समोर घेत तो थोडा रागातच ड्रायव्हर ला म्हणाला "बस दादा अजुन एक तिसरी सीट भेटलं की लगेच निघू"
तेवढयात एक महिला कॅब जवळ येऊन उभी राहिली "काय मॅडम मुंबई जाणार का? ड्रायव्हर ने विचारले,
चेहऱ्यावर कसलेही भाव नसणाऱ्या त्या महिलेने होकारार्थी मान हलवली "३०० रुपये लागतील" त्यावर सुद्धा एक चकार शब्द ही न बोलता त्या महिलेने फक्त मान डोलवत होकार दर्शवला आणि ती मागच्या सीट वर अक्षय च्या बाजूला येऊन बसली.

ती तशी तीशितली महिला असावी. दिसायला ती साधी च होती आणि चेहऱ्यावर अगदी निर्विकार भाव होते. तिने अक्षय कडे एक कटाक्ष टाकला त्यावर अक्षय ने तिच्याकडे पाहून एक स्मितहास्य केले तिने चक्क दुर्लक्ष करत खिडकीतून बाहेर पाहण्यास सुरुवात केली. अक्षय ला थोड विचित्र वाटलं की कदाचित हिला माझं तीच्यकडे पाहून स्माईल देणे आवडले नसावे म्हणून त्याने सुद्धा खिडकीतून बाहेर पाहायला सुरुवात केली आता गाडी बरेच पुढे आली होती. गाडी आता भुयारातून जाणार होती अक्षय च सहज त्या महिलेकडे लक्ष गेले तर ती अगदी विचित्र प्रकारे हास्य करत समोर पाहत होती. इतका वेळ चेहऱ्यावर अगदी निर्विकार भाव घेऊन बसलेली महिला अचानक असे विचित्र भाव चेहऱ्यावर घेऊन का हसत आहे. हेच अक्षय ला कळत नव्हते भुयारातून जात असताना अचानक त्या महिलेने जोरजोरात हसायला आणि ओरडायला सुरुवात केली आणि तिने चालत्या गाडीतून उडी घेतली.

काय झालं हे समजायला ह्या तिघांना काही सेकंदाचा अवधी लागला आणि अचानक ड्रायव्हर ने अर्जंट ब्रेक मारला आता त्यांनी मागे पाहिलं तर मागून येणाऱ्या गाड्या आणि वाहने क्षणात कुठे गायब झाले होते आणि भुयारात फक्त ते तिघे च होते ड्रायव्हर, अक्षय आणि तो तिसरा पॅसेंजर तिघे एकमेकाकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहू लागले तेवढ्यात एक जोराची किंकाळी सर्वत्र पसरली आणि एका बाईच्या रडण्याचा आवाज तिघांना येऊ लागला ड्राइव्हर ने हे सर्व लगेच ओळखले आणि त्याने दोघांना पटकन गाडीत बसायला सांगितले तिघे गाडीत बसले आणि ड्रायव्हर ने फुल स्पीड वर गाडी पळवायला सुरुवात केली काही क्षणात च त्याला गाडीच्या साईड मिरर मध्ये काहीतरी वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या मागे येताना दिसले ती आकृती स्पष्ट होताच डोक्यात मुंग्यांच वारूळ उठावं तस त्याला वाटलं त्याने अक्षय आणि त्या दुसऱ्या पॅसेंजर ला सांगितले काही झालं तरी मागे वळून पाहू नका त्यावर दोघे सुद्धा ठीक आहे म्हणाले अक्षय ने सहज गाडीच्या काचातून बाजूला पहिले तर त्याच्या सर्वांगावर काटा उभा राहिला तिच महिला त्याला गाडीच्या बाजूने त्याच वेगात पळताना दिसत होती आणि त्याच्याकडे पाहून एक क्रूर हास्य करत होती परंतु ह्या वेळी तिचे रूप अतिशय भयानक होते विस्ककटले केस, अर्धवट जळालेला तिचा चेहरा आणि अतिशय भेसूर वाटणारे तिचे ते रक्तासरखे लालबुंद डोळे अक्षय ला काहीच समजत नव्हते की नेमके काय सुरू आहे त्याने डोळे घट्ट मिटले ड्रायव्हर गाडी पळवत च होता आणि मोठ्या मोठ्याने हनुमान चालीसा म्हणत होता काही मिनिटांत ते त्या भुयारातून बाहेर आले आणि त्यांना एक आर्त किंकाळी ऐकायला आली आणि त्यांचे सर्वांग शहारले.

पुढे एका ढाब्यावर त्यांनी गाडी थांबवली. आणि चहा वगैरे घेऊ लागले तिथे घडला सर्व प्रकार त्यांनी एक दोन जणांना सांगितला एक व्यक्ती त्यांचे बोलने शांतपणे ऐकत होता. अचानक तो म्हणाला "हडळ, हडळ होती ती, असे म्हणतात की, ह्या रस्त्यात एका बाईला एका ट्रक ने अतिशय वाईट प्रकारे चिरडले होते तेव्हापासून ती बाई हडळ होऊन प्रवाशांना झपाट्ते आणि कार मधून उडी मारण्यास भाग पाडते"

त्या व्यक्तीचे ते बोलने ऐकून आम्हा तिघांना धक्काच बसला आणि आज किती मोठ्या संकटातून आम्ही वाचलो आहोत हे जाणवले..

- समाप्त


 
Top